मेवार
शरीर थकलंय
पण मन थकलं नाही - २
स्वर्ग
भेटायास स्वतः आले आहे
पण
काहीच सुचत नाही
नभ
उतरून आलंय कि मी उडतीये
ह्याचा गेले कित्येक तास पत्ताच
लागत नाही
जमिनी
पासून किती तरी उंचीवर डोंगरामध्ये - २
एका
रात्रीतून त्या बालम ने राणीसोबत
लग्न खातर
नखापासून तलाव बांधले
नखापासून तलाव बांधले
एखाद्या परिच्या कथे सारखे ते वाटले
इथल्याच
एका शिखरावर माझे गुरु होते
जन्मले - २
ते
श्रीपाद वल्लभ इथं तपस्चर्या करीत होते
मन भरून आले आणि डोळ्यांना पांझर फुटले
२००
पायऱ्या होते तरीही मी पळत सुटले
इथेच
पहिले दोन दिव्यस्थान - २
ब्रह्मकुमारी आणि प्राचीन जैन मंदिर
ब्रह्मकुमारी आणि प्राचीन जैन मंदिर
दिलवाडा ज्याचे नाम
ज्याचे इतिहासात लिहिले गेले अप्रतीम कोरीव काम
ज्याचे इतिहासात लिहिले गेले अप्रतीम कोरीव काम
अत्ताच
कुठे शुद्धीवर येत होते - २
चित्त
थार्यावर आले आणि गडावर जाऊन पोहोंचले
शूरवीर
ते राजे आणि त्याचे ते प्रताप
होय
!
मेवारची
शान राजा उदय सिंह आणि त्यांचे
पुत्र राणा प्रताप
ह्या
कोशातून बाहेर पडणं जर कठीणच
होतं - २
राजे
तर राजे
पण राजपूत स्त्रियांनीहि
इतिहास रचलं होतं
पण राजपूत स्त्रियांनीहि
इतिहास रचलं होतं
आई नाही ती होती पन्ना धाई - २
तिने स्वतःचा पोराचा बळी देऊन
राजा उदय सिंहाला वाचवला होतं
काळीज कापून तिने तिचं कर्तव्य पार पाड़लं
राजा उदय सिंहाला वाचवला होतं
काळीज कापून तिने तिचं कर्तव्य पार पाड़लं
राजपूत स्त्रियांचा स्वभिमानानी - २
अग्नीला मात दिली
शत्रुना बळी ना जाओ
म्हणून आगीत उडी टाकली
अग्नीला मात दिली
शत्रुना बळी ना जाओ
म्हणून आगीत उडी टाकली
इथलीच होती श्यामची वेडी मीरा - २
प्रेमात तिने जोग होता धरला
श्याम नामचा जाप करत
तिचा आत्मा श्याम मधे विलीन झाला
प्रेमात तिने जोग होता धरला
श्याम नामचा जाप करत
तिचा आत्मा श्याम मधे विलीन झाला
खरचं तोः
काळ किती अजब होता - २
शूरांचा
आणि स्वभिमानींचा होता
खूप
स्पष्ट होता सरल आणि साधा होता
थेट आत्म्याला स्पर्श करणारा होता…
थेट आत्म्याला स्पर्श करणारा होता…
पुढचा
प्रवास सुरु झाला - २
ते
वातावरण वेगळं होतं
ते वारं अजमेरचा होतं
एक वेगळी संस्कृति आणि दुर्मिळ चित्र होतं
त्या
जमिनीला हिंदू मुस्लीमचा
मुळात भेदच नव्हता ठाऊक - २
एक
होतं नभ आणि दुसरा पाउस
माणुसकीचा होता तो अप्रतीम नजारा
जाती वाद कारणाऱ्यांचा चेहऱ्यावर तो पाच बोटांचा छापा होता
काही
अंतरावर पुष्कारची वेगळीच
गाथा होती - २
ब्रह्माची
ती कहानी पहिल्यांदाच ऐकली
होती
पुरुषार्थ
त्या ब्राम्हाला महाग होता
पडलां
पहिल्या
पत्नीने त्यांना श्राप होता
दिला।
पित्र
शांती इथेच सार्यांनी केली - २
पण
तिथले चित्र पाहून मी मात्र निराश झाले
इतके
पवित्र स्थान जे करीत होते जिवंत
आणि म्रीतला शांत
लोंकानी आपले धुणे धून त्याला केले खूप घाण
स्त्रिया
इथेच स्नान करत होती - २
आणि सर्यांच्या नज़रा त्यांना चाळत होती
खूप
हास्यास्पद होते ते चित्र
स्त्रिया
होते अर्ध नग्न पाण्यातून
निघत
सार्यांसमोर
साडी नेसून - २
मग होते डोक्यावर पदर टाकत
मग होते डोक्यावर पदर टाकत
हिंदु
संस्कृतीला तेंव्हा तडा नव्हता जात
पर्दा आणि वगेरे प्रथा तेंव्हा होते माती खात
पुढचे
होते प्रवास जैपुरचे - २
हे
होते आमचे शेवटचे मुकाम
ह्याचा
नंतर तेच ते रडणे
आणि तेच ते सगळे काम धाम
आणि तेच ते सगळे काम धाम
त्याच दिवशी बिरला मंदिर पाहिले - २
रात्रि होते एक छोटे से गेट टुगेदर
आणि आभार सत्कार
सगळ्यांनी
केले काही न काही सादर
वेगळे
वेगळे आलेले कुटुंब त्या दिवशी
एक मोठे परिवार होते वाटत
गाणे
म्हंटले कुणी,
कुणी
गोष्टी होते सांगत - २
मी एका कोपऱ्यात ही कविता होते लिहत
मी एका कोपऱ्यात ही कविता होते लिहत
त्या
रात्री माल झोपच आली नाही
माला
परत घरी जायची मुळीच नव्हती
घाई
एक
एक तास घड्याळातला - २
अंगावर काटे होता आणत
अंगावर काटे होता आणत
हे
सात दिवस आयुशातले
किती पटकन गेले हसत खेळत
किती पटकन गेले हसत खेळत
दुसर्या
दिवशी सकाळी - २
जुन्या जयपूरला निघाली स्वारी
ह्याच
भूमीवर रचली
एका राजा राणीने आपली प्रेम कहाणी
एका राजा राणीने आपली प्रेम कहाणी
राजा
सवय सिंह आणि राणी गायत्री - २
गायत्री
देवीच्या सौंदर्याचे इथे
सगळेच होते दिवाने
सार्यांची
होती ती लाडकी
सगळ्यांनीच तिचे मान राखले
सगळ्यांनीच तिचे मान राखले
जयपूर हे एक गुलाबी शहर - २
मात्र
उनानी होता आणला प्रचंड कहर
हवा
महाल पहिला इथे
पहिला
राजवाडा थाट
आमेरच्या
त्या गडावर पहिले - २
राजा मान सिंहचे इतिहास
राजा मान सिंहचे इतिहास
त्या
महालाचे होते काम कमाल
जस सुख मंदिर आणि शीश महाल
जस सुख मंदिर आणि शीश महाल
सुर्य
आणि चंद्रानी जंतर मंतारला - २
विज्ञान होते मांडले
विज्ञान होते मांडले
अबू
ते जैपुरचा प्रवास
तिथे येऊन थांबले
तिथे येऊन थांबले
ह्याचा
यशाचा श्रेय - २
गणेश महेंद्र आणि निलेश मस्के
ह्या त्रिमूर्तीचेच आहे
गणेश महेंद्र आणि निलेश मस्के
ह्या त्रिमूर्तीचेच आहे
ज्यांनी प्रत्येकाला फुलासारखं
जपले
त्यांचा शिवाय - २
ही सहली कठीण होती
सात दिवस साथ दिली
जसं शरीरा सोबत सावली
प्रियांका अशोक जवळगावकर